कलम १४४ लागू असल्याचे दिले कारण !
बेंगळुरू (कर्नाटक) – येथे हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी जमलेल्या बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांच्या कार्यकर्त्यांना रोखण्यात आले. राज्यात कलम १४४ लागू केल्याने निवडणूक आयोगाकडून त्यांना रोखण्यात आले आहे.
#BreakingNews: कर्नाटक में हनुमान चालीस पाठ पर चुनाव आयोग ने लगाई रोक
▶️ वोटिंग से पहले चालीसा पाठ पर लगाई गई रोक #karnatakaelection2023 #BJP #Congress #EC @VishalKalranews @koielautademere pic.twitter.com/548p5TYUav
— Zee News (@ZeeNews) May 9, 2023
या संघटनांनी ८ मे या दिवशी घोषित केले होते की, ते ९ मे या दिवशी देशभरातील प्रमुख मंदिरांमध्ये हनुमान चालिसाचे पठण करणार आहेत. या संघटनांनी त्याला ‘हनुमंत शक्ती जागरण अभियान’ असे नाव दिले आहे. काँग्रेसने राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे घोषणापत्र प्रसिद्ध करतांना बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्याला बजरंग दल, विहिंप आणि भाजप यांच्याकडून विरोध केला जात आहे.