७ सहस्र मोकाट कुत्र्यांची दहशत !
जालना – शहरातील विविध रस्त्यांवर बिनधास्तपणे वावरणारी मोकाट कुत्री वाहनचालकांच्या अंगावर येतात. ये-जा करणार्या नागरिकांसह शाळेत जाणार्या लहान मुलांच्याही पाठीमागे लागतात. शहरात मोकाट कुत्र्यांनी प्रतिदिन ६ ते ११ जणांचा चावा घेतल्याच्या घटना घडत आहेत. नगरपालिकेकडून प्रतिवर्षी निर्बिजीकरणासाठी लाखो रुपयांची तरतूद केली जाते; परंतु गेल्या काही वर्षांत निर्बिजीकरण करण्यात आलेले नाही. शहरात उघड्यावरच मटनांची दुकाने थाटल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे.
१. ४ लाख लोकसंख्या असलेल्या जालना शहरात ७ सहस्र मोकाट कुत्र्यांची दहशत आहे. मागील ३ वर्षांत मोकाट कुत्र्यांनी ५ सहस्र ४७५ जणांचे लचके तोडल्याची जिल्हा सामान्य रुग्णालयात नोंद झाली आहे. रुग्णालयात प्रतिदिन ४० ते ६० रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
२. कुत्र्यांची ही समस्या नगरपालिकेच्या सभेत वारंवार चर्चिली गेली; परंतु प्रत्यक्षात ती सुटलेली नाही.
३. निर्बिजीकरणासाठी चालू वर्षात १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. निर्बिजीकरणासाठी येत्या ४ मासांत स्वतंत्र निविदा काढली जाणार आहे.
लवकरच आंदोलन करणार ! – शशिकांत घुगे, माजी नगरसेवकवारंवार निवेदने देऊनही मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यामुळे कांचननगर, शिवनगर आणि नूतन वसाहत या भागांत भटक्या कुत्र्यांचा फार त्रास होतआहे. उघड्यावर होणार्या मांसविक्रीमुळे ही संख्या वाढत आहे. भटक्या कुत्र्यांनी अनेकदा लहान मुलांचे लचके तोडले आहे. त्यामुळे आता या प्रकरणी लवकरच आंदोलन करणार आहोत. |
संपादकीय भूमिकाहे प्रशासनाला लज्जास्पद ! |