(म्हणे) ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर !’ – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा जावईशोध !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड

ठाणे – ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर आहे. प्रत्यक्षात केरळची सत्य परिस्थिती वेगळीच आहे. विदेशातून भारतात येणारा जो पैसा आहे, त्याच्यातील ३६ टक्के पैसा हा केरळचे नागरिक पाठवतात. मागील वर्षी त्यांनी २.३६ लाख कोटी रुपये पाठवले. केरळचा साक्षरतेचा दर ९६ टक्के आहे, तर भारताचा ७६ टक्के आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटद्वारे केले आहे. (केरळमधील साक्षरतेचा लव्ह जिहादशी काय संबंध ? सुशिक्षित तरुणीही लव्ह जिहादला बळी पडलेल्या असतांना असा अजब तर्क लावणारे जितेंद्र आव्हाड स्वतःचेच हसे करून घेत आहेत ! – संपादक) 

संपादकीय भूमिका

  • चित्रपटाच्या माध्यमातून हिंदु समाज ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात जागृत होणे हे जितेंद्र आव्हाड यांना खुपत असल्याने ते चित्रपटाला खोटे ठरवण्याचा आटापिटा करत आहेत, हे समजायला जनता दूधखुळी नाही !
  • याआधी जिहादी आतंकवादी इशरत जहाँ ही चकमकीत ठार झाल्यानंतर आव्हाड यांनी त्याला विरोध केला होता. सातत्याने धर्मांधांची तळी उचलून त्यांच्या मतांसाठी राष्ट्रघातकी विचार मांडणारे आव्हाड यांच्यासारखे राजकारणी हे लोकशाहीला कलंक !
  • महाराष्ट्रातून मार्चमध्ये २ सहस्र २०० मुली बेपत्ता झाल्या, तसेच उल्हासनगर येथे १ मासात ६ हिंदु युवतींचे मुसलमानांसमवेत पलायन केले. या घटनांविषयी आव्हाड मूग गिळून गप्प का ?