पुणे येथील वेताळ टेकडी टिकली पाहिजे ! – आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांनी वेताळ टेकडीची पहाणी केली

पुणे – पुण्यातील नदी सुधार प्रकल्प, वेताळ टेकडी, मुंबईतील आरे, बारसू या सर्व ठिकाणी सध्या जी परिस्थिती दिसत आहे, त्यातून जनतेच्या विरोधात हुकूमशाही चालू आहे, असे वाटते. ज्या-ज्या ठिकाणी प्रकल्प चालू आहेत, तेथील स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतले जात नाही. स्थानिक लोकांच्या नेमक्या काय भावना आहेत, त्या सरकारपर्यंत पोचवण्याची आवश्यकता आहे. अन्यथा सामान्य जनता रस्त्यावर उतरल्याविना रहाणार नाही. पुण्यातील वेताळ टेकडी टिकली पाहिजे, अशी भूमिका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मांडली.

पुण्यातील वेताळ टेकडी येथील प्रस्तावित असलेल्या बालभारती ते पौडफाटा रस्ता, २ बोगदे या प्रकल्पाला पुणेकर विरोध करत आहेत. पुणे दौर्‍यावर असतांना आदित्य ठाकरे यांनी वेताळ टेकडीची पहाणी केली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही वेताळ टेकडीची पहाणी केल्यानंतर पर्यावरणप्रेमींशी चर्चा केली होती.