इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या हवाई आक्रमणात १२ जण ठार

जेरूसलेम (इस्रायल) – इस्रायलने गाझा पट्टीत केलेल्या हवाई आक्रमणामध्ये १२ जण ठार झाले, तर २० जण घायाळ झाले. मृतांमध्ये जिहादी संघटनेचे ३ प्रमुख कमांडर आणि त्यांचे कुटुंबीय यांचा समावेश आहे.

या आक्रमणामध्ये लढाऊ विमानांसह ४० विमानांचा समावेश होता. इस्रायलच्या या कारवाईनंतर जिहादी संघटनेने ‘याचा सूड उगवू’, असे म्हटले आहे.