ठाणे येथील अनंत करमुसे यांच्यावर आक्रमण केल्याचे प्रकरण
ठाणे – अनंत करमुसे यांच्यावर आक्रमण केल्याच्या प्रकरणाी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठाणे पोलिसांनी अनुमाने ४५० पानांचे पुरवणी आरोपपत्र ठाणे न्यायालयात प्रविष्ट केले. यापूर्वी या प्रकरणी २ आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे मंत्री असतांना त्यांनी ५ एप्रिल २०२० या वर्षी अनंत करमुसे यांना स्वतःच्या घरी आणून मारहाण केली होती. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करून पोलिसांनी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्ते यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. पोलिसांच्या अन्वेषणात त्रुटी असल्याचा आरोप करत करमुसे हे सर्वोच्च न्यायालयात गेले. यावर न्यायालयाने या प्रकरणाचे अन्वेषण करण्याचा आदेश पोलिसांना दिला होता.