सुरत (गुजरात) – ग्राहकांना गोमांस भरलेले सामोसे खाऊ घातल्याच्या प्रकरणी गुजरात पोलिसांनी इस्माईल युसूफ याला अटक केली. सुरत जिल्ह्यातील कोसाडी गावात खाद्यपदार्थांची विक्री करणारा इस्माईल युसूफ गोमांस भरलेले सामोसे विकत असे. त्याच्या दुकानात बंदी असलेल्या गोमांसची विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली.
१. गोमांस भरलेले सामोसे विक्री करणार्या युसूफ याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. पोलीस पथकाने सामोसे घेऊन जाणारी त्याची गाडी थांबवून तपास चालू केला. या वेळी पोलिसांनी गाडीतील सामोसे जप्त केले आणि इस्माईल युसूफ याला अटक केली.
Surat: Ismail Yusuf arrested for selling beef-stuffed samosas to his customers, the cows were slaughtered near the river. Read detailshttps://t.co/p1AnxWVhFy
— OpIndia.com (@OpIndia_com) May 25, 2023
२. अटकेनंतर पोलिसांच्या अन्वेषणात आरोपीने गोमांस असलेले सामोसे बनवण्यासाठी सुलेमान आणि नगीन वसावा यांच्याकडून गोमांस खरेदी करत असल्याची स्वीकृती दिली. (गुजरात राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू असतांना गोहत्या होणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)
३. न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेतील अधिकार्याने दिलेल्या प्रमाणपत्रात जप्त केलेल्या सामोशांमध्ये गोमांस असल्याची पुष्टी केली आहे. यानंतर गुजरात पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले.
संपादकीय भूमिका
|