भुवनेश्वर (ओडिशा) – ओडिशा सरकारने राज्यातील शिवमंदिरांमध्ये गांजा अर्पण करणे आणि त्याचा प्रसाद वाटणे यांवर बंदी घातली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर वाद चालू झाला आहे.
१. ओडिया भाषा, साहित्य आणि संस्कृती विभागान या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे. आध्यात्मिक नेते आणि समाजसुधारक असलेले पद्मश्री पुरस्कार प्राप्त बाबा बलिया यांच्या सांगण्यावरून विभागाने हे पाऊल उचलले होते. अनेक शिवमंदिरांच्या पुजार्यांनी ते चुकीचे सांगितले आहे.
२. सांस्कृतिक विभागाचे मंत्री अश्विनी पात्रा म्हणतात की, भगवती मंदिरात ज्याप्रमाणे प्राण्यांच्या बळी देण्यावर बंदी आहे, त्याचप्रमाणे गांजावरही बंदी घालण्याची आवश्यकता आहे.
संपादकीय भूमिका
|