रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिलेल्या जिज्ञासूंचा अभिप्राय !       

‘रामनाथी आश्रमातील साधक शिस्तीचे पालन काटेकोरपणे करतात. आश्रमात प्रत्येक लहान लहान गोष्टीचे योग्य नियोजन करण्यात येते. आश्रमातील स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे. ‘येथील साधकांचे कौतुक करावे’, असे वाटते.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या वेळी नृत्यकलेशी संबंधित साधिकेला नृत्य करतांना आलेल्या अनुभूती

२२.५.२०२२ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव झाला. या जन्मोत्सवाच्या वेळी निघालेल्या दिंडीत विविध नृत्ये सादर करण्यात आली. या नृत्यात नृत्यकलेशी संबंधित साधिका सहभागी होत्या. जन्मोत्सवाच्या वेळी झालेल्या दिंडीत या नृत्याच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दर्शनासाठी शरणागतभावाने झुकलेली रथोत्सवाच्या मार्गावरील झाडे !

आम्ही जेथे उभे होतो, तिथे रथाचे आगमन होण्यास थोडा वेळ होता. तेव्हा माझे लक्ष मार्गावरील झाडांकडे गेले. तेथील सर्व झाडे पुष्कळ झुकलेली दिसली. त्यांना पाहून ‘ही झाडे गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) दर्शनाची वाट पहात आहेत’, असे मला वाटले…

कु. मधुरा भोसले यांच्या भावानुसार त्यांच्या खोलीतील भगवान श्रीकृष्ण आणि शिव यांच्या चित्रांमध्ये दैवी पालट होऊन ती सजीव होणे !

तुझ्या आंतरिक साधनेमुळे तू श्रीकृष्ण आणि शिव या देवतांच्या तत्त्वाशी काही काळ एकरूप होतेस. त्यामुळे तुला त्यांच्या संदर्भात वरील अनुभूती येते. याला ‘तात्कालिक सायुज्य मुक्ती मिळणे’, असे म्हणतात – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कराड प्रांत कार्यालयात लाच घेतांना दोघांना रंगेहात पकडले !

कराड येथील ९ शेतकर्‍यांकडून भूसंपादनाच्या प्रक्रियेत पाठपुरावा प्रतिज्ञापत्र घेतलेले होते. प्रतिज्ञापत्रातील मूल्यांकन प्रक्रियेविषयी जाणून घेण्यासाठी तक्रारदार उपविभागीय अधिकारी कार्यालयात गेल्यावर भूसंपादन शाखेतील लिपिक रामचंद्र श्रीरंग पाटील आणि दिनकर रामचंद्र ठोंबरे यांनी लाच मागितली होती.

पुणे येथील ‘दगडूशेठ’ गणपति मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतींची पुष्पसजावट !

‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट’ आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने येथील ‘दगडूशेठ’ गणपति मंदिरात २३ मे या दिवशी गाभार्‍यासह प्रवेशद्वारावर शेषनागाच्या विविधरंगी भव्य फुलांच्या भव्य प्रतिकृती साकारून सजावट करण्यात आली.