‘धर्मवीर शंभूराजे’ पुण्यतिथीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून २ लाख ९९ सहस्र रुपये निधी संमत !

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ वढु बुद्रुक (संग्रहित छायाचित्र)

पुणे – धर्मपीठ छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ वढु बुद्रुक येथे फाल्गुन अमावास्येला बलीदानदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येतो. राज्याच्या, तसेच देशाच्या कानाकोपर्‍यातून शिवभक्त, शंभू भक्त येत असतात. त्याचप्रमाणे वर्षभर शंभू भक्तांची गर्दी असते. या बलीदानदिनाचे स्वरूप मोठे होण्यासाठी पिंपरी-चिंचवड येथील भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचे कायम प्रयत्न असतात. ग्रामपंचायत वढू बुद्रुक यांच्या सततच्या २ वर्षांच्या प्रयत्नांतून, तसेच आमदार महेश लांडगे यांच्या विशेष प्रयत्नांतून प्रतीवर्षीच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने २ लाख ९९ सहस्र रुपये निधी संमत करण्यात आला. त्याचप्रमाणे या वर्षाचा २०२३ चा धनादेशही सुपुर्द करण्यात आला.

भाजपचे आमदार महेश लांडगे

आमदार लांडगे यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या वेळी माजी सरपंच अंकुश शिवले, वढू बुद्रुकच्या (ता. शिरूर) सरपंच सारिका अंकुश शिवले, ग्रामपंचायत सदस्य माऊली आप्पा भंडारे आदी उपस्थित होते.