श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने सासवड येथे ६०० हून अधिक मुली आणि महिलांना दाखवला ‘द केरल स्टोरी’ चित्रपट !

सासवड (जिल्हा पुणे) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदर यांनी तिकीट काढून आतापर्यंत ६७० तरुण मुली आणि महिला यांसाठी सत्य घटनेवर आधारित असणारा ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट दाखवला आहे. मुली आणि महिलांना विनामूल्य चित्रपट पहायला मिळाला. चित्रपटाच्या प्रारंभी  शिववंदना घेऊन चित्रपट चालू करण्यात आला, तसेच चित्रपट संपल्यानंतर प्रतिष्ठानच्या धारकर्‍यांनी भारतातील ‘लव्ह जिहाद’ची सद्यःस्थिती परखडपणे मांडली आणि सध्या सासवडमधील वाढत्या ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांविषयी महिलांना अवगत केले, तसेच हा चित्रपट विनामूल्य दाखवण्याचा उद्देशही स्पष्ट करण्यात आला. ते ऐकून माता-भगिनींचे डोळे पाणावले आणि सर्वांनी एकत्र शपथ घेतली की, येथून पुढे आम्ही सहकुटुंब हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी प्रतिष्ठानच्या सोबत कायमस्वरूपी रहाणार.

प्रतिष्ठानच्या वतीने प्रखर हिंदुत्वनिष्ठ धारकरी तेजस संजय शिवरकर, अमित विजय पवार यांनी मार्गदर्शन केले, तसेच सोबत सहकार्य सई मोजे, किशोरी धुमाळ आदींनी केले. संग्राम पाटोळे, कैवल्य निरगुडे, सुहास भिसे आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले.