३ गायींचा जीव वाचवण्यात गोरक्षकांना यश
दौंड (जिल्हा पुणे) – कत्तल करण्याकरता आणलेली १ गाय आणि १६ वासरे यांना घेऊन संशयित आरोपी फैजान कुरेशी हा पसार झाला आहे. गोरक्षकांच्या साहाय्याने ३ गायींचा जीव दौंड पोलिसांनी वाचवला. गोरक्षक अक्षय कांचन यांनी दिलेल्या तक्रारीवरून दौंड पोलीस ठाण्यात फैजान कुरेशी आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (यातून गोवंश हत्याबंदी कायद्याची किती प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक आहे, हे लक्षात येते. – संपादक)
दौंड शहर आणि परिसरात गोहत्या करून गोमांसाची वाहतूक आणि विक्री करणार्या टोळीचा प्रमुख अश्पाक उपाख्य लाला कुरेशी याच्यासह एकूण ७ सदस्यांवर ८ मे या दिवशी तडीपारीची कारवाई केली होती. सदर कारवाईनंतर गोहत्या थांबेल, अशी आशा निर्माण झाली असतांना दौंड शहरात आणखी २ टोळ्या गोहत्येत सक्रीय असल्याचे स्पष्ट झाले आहे.