पुणे येथे ब्रेक निकामी झालेल्या खासगी बसची ५ – ६ वाहनांना धडक !

कोंढव्यातील एन्.आय.बी.एम्. रस्त्यावर इशरत बाग परिसरात २१ मे या दिवशी भरधाव खासगी बसचे ब्रेक निकामी होऊन बसने ५ ते ६ वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे.

विश्व हिंदु परिषद आणि दुर्गा वाहिनी यांच्या वतीने नेवासामध्ये (नगर) युवतींची शोभायात्रा !

विश्व हिंदु परिषद, दुर्गा वाहिनी बजरंग दलाच्या वतीने पथ संचलन करत १९ मे या दिवशी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये दुर्गा वाहिनीच्या ३५० ‘दुर्गा’ सहभागी झाल्या होत्या.

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याकडून ‘द केरल स्टोरी’चे कौतुक !

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ‘द केरल स्टोरी’चे कौतुक करत बॉलीवूडला फटकारले आहे.

वर्धा येथे भव्य ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदु राष्ट्रासाठी संघटित होण्याचा संकल्प !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त येथील आर्वी रोड येथे भव्य ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.

जयपूर (राजस्थान) येथे सरकारी अधिकार्‍याकडून बेहिशोबी संपत्ती जप्त

सरकारच्या योजना भवनाच्या तळघरामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या कपटात ठेवण्यात आलेली २ कोटी ३१ लाख रुपयांची बेहिशोबी रोकड आणि १ किलो सोने सापडले आहे.

दीपा चौहान यांचा बोलावता धनी कोण ? – विजय चौगुले, जिल्हाप्रमुख, शिवसेना

ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांच्यावर काही दिवसांपूर्वी दीपा चौहान या महिलेने नेरुळ पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराची तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या आरोपातून गणेश नाईक यांना न्यायालयाने दिलासा दिलेला आहे…

भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक व्हावे ! – रमेश बैस, राज्यपाल

२१ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे राज्यपालांच्या हस्ते मेजर कौस्तुभ राणे यांचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ देऊन मरणोत्तर सन्मान करण्यात आला.