आरंभ गर्जना सोहळ्यात रोखठोक प्रतिपादन !
मुंबई – जे आमचे आहे, ते आम्हाला मिळालेच पाहिजे. त्यावर आमचा अधिकार आहे. प्राचीन काळापासून या देशाची प्रत्येक इंच भूमी हिंदु समाजाचीच आहे. त्यानंतर इस्लामी आक्रमण झाले आणि आमच्याच मंदिरांवर विविध मशिदी अन् थडगे बांधण्याचा कार्यक्रम इस्लामी राज्यकर्त्यांनी केला; पण आता ही भूमी आमची आहे. जसे आम्ही अयोध्येत श्रीराम मंदिर प्रतिष्ठान मिळवले, तसेच श्रीकृष्ण जन्मभूमी आणि श्रीकृष्ण जन्मस्थान हेही आमचेच आहे. त्यासाठी जो संघर्षाचा आरंभ आहे, तो आजपासून झाला. यासाठी आम्ही एकीकडे कायदेशीर बाजूने चालतच आहोत; पण त्याच्या जोडीला हिंदु समाजात जनजागृती व्हावी आणि हिंदूंचा अधिकार मिळवण्यासाठी प्रत्येक हिंदूने खांद्याला खांदा लावून काम करून आवाज उठवावा, यासाठी हा आरंभ केला आहे. ही आरंभाची गर्जना महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत पोचेल, असे प्रतिपादन मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले. २९ डिसेंबर या दिवशी बालाजी मंदिर, वरळी येथे आयोजित ‘आरंभ गर्जना सोहळा धार्मिक विधी’ला ते उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास यांच्या वतीने महाराष्ट्रात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला उपस्थित राहून योगेश्वर भगवान श्रीकृष्णाच्या चरणी नितेश राणे नतमस्तक झाले.
मंत्री नितेश राणे पुढे म्हणाले की,…
१. आमच्या नावापुढे कुठलेही पद लागण्याआधी आमच्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर ‘आम्ही हिंदु आहोत’ हा उल्लेख आहे, हे विसरता येणार नाही. ही पदे आणि दायित्व आहेच; पण हिंदु ही आमची ओळख आहे. आमच्यासाठी आमचा धर्म प्रथम असल्याने ते दायित्व मी नेहमीच पार पाडणार आहे.
२. भाजपच्या खासदार प्रा. (डॉ.) सौ. मेधा कुलकर्णी यांनी हिंदु म्हणून योग्य भूमिका घेतली. (भिंतीवरील हिरव्या रंगावर त्यांनी भगवा रंग चढवला होता.) या हिरव्या सापांना तिथल्या तिथे ठेचण्याचे काम आपण हिंदु म्हणून केले पाहिजे.
३. राज्यात हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार आहे. कडवट हिंदुत्वनिष्ठ मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस बसले आहेत. त्यामुळे अशा प्रकारची कुठलीही नाटके या राज्यात सहन होणार नाही.
४. हिंदु समाजाने मतदान करून हे सरकार आणले आहे. त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे आणि हिरवे आक्रमण तिथल्या तिथे थांबवणे, हे आमचे परम कर्तव्य आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात कुठेही अशी मस्ती सहन केली जाणार नाही.