सांगलीत भोबे गटारातून निघाला २२ टन कचरा !

सांगलीत भोबे गटारातून निघालेली घाण, प्लास्टिक कचरा, तसेच अन्य वस्तू

सांगली – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात सध्या मान्सूनपूर्व नालेसफाई गतीने चालू आहे. सांगलीतील मोठी समजली जाणारी भोबे गटार स्वच्छ करण्यात येत असून यातून २२ टन कचरा बाहेर काढण्यात आला आहे. यात प्लास्टिकच्या बाटल्या आणि प्लास्टिकचा कचरा यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. पर्यावरणाला घातक असणारे प्लास्टिक हे गटारात टाकले जात असल्याने गटार तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिकचा कचरा हा गटारात न टाकता घंटागाडीत टाकावा, असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले आहे.

संपादकीय भूमिका

केवळ मान्सूनपूर्व नालेसफाई न करता नियमितपणे सफाई कशी होईल, हे प्रशासन बघेल का ?