जयपूर (राजस्थान) येथे सरकारी अधिकार्‍याकडून बेहिशोबी संपत्ती जप्त

जयपूर (राजस्थान) – येथील सरकारच्या योजना भवनाच्या तळघरामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या कपटात ठेवण्यात आलेली २ कोटी ३१ लाख रुपयांची बेहिशोबी रोकड आणि १ किलो सोने सापडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी विभागाच्या ८ जणांना कह्यात घेतले आहे. ही संपत्ती या विभागाचे सहसंचालक आणि स्टोअरचे प्रमुख  वेदप्रकाश यादव यांची असल्याचे उघडकीस आले. यादव यांनीही ही संपत्ती त्यांची असल्याचे मान्य केले आहे. या प्रकरणाची चौकशी आता लाचलुचपत प्रतिबंधक खाते करत आहे. प्राथमिक चौकशीत ही रक्कम कंत्राटदाराकडून कंत्राट देण्याच्या बदल्यात घेण्यात आल्याचे समोर आले आहे.

संपादकीय भूमिका

अशा भ्रष्टाचार्‍यांना सरकारने आता फाशीच दिली पाहिजे !