सेनादलांच्या प्रहार क्षमतेत वाढ करण्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे हळूहळू येत्या १० वर्षांत पाकिस्तान त्या क्षेत्रात आपल्याशी जवळजवळ बरोबरी साधू शकेल, अशी गंभीर परिस्थिती आहे. दुर्दैवाने देशापुढील या संकटापुढे राजकीय नेते प्रामाणिक कळकळीने लक्ष देत नाहीत. त्यांचा सारा वेळ सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी खटाटोप करण्यात आणि त्यासाठी आवश्यक असलेले द्रव्यबळ मिळेल त्या मार्गाने गोळा करण्याकडे दिला जात आहे.
देशाच्या अर्थसंकल्पातील सरासरी ९८ टक्के व्यय हा सभागृहात चर्चा न करताच संमत केला जातो, ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. हे चित्र पालटले नाही, तर देशाने आजवर साधलेली अभिमानास्पद प्रगती पाण्यात जाण्याची शक्यता क्षितिजावर स्पष्टपणे दिसून आलेली आहे. हे चित्र पालटावयाचे असेल, तर विशुद्ध राष्ट्र्रवादी विचारांचे आणि खर्या अर्थाने धर्माचरण करणारे प्रामाणिक नेते निर्माण होणे आवश्यक आहे. येणार्या काळात तसे घडेल, अशी आशा बाळगूया.
(साभार : मासिक ‘धर्मभास्कर’, ऑगस्ट २००७)