कर्नाटकातील भाजपचे आमदार माडाळ विरुपाक्षप्पा यांना लाचखोरीच्या प्रकरणी अटक

अशांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा झाली, तरच इतरांना जरब बसेल !

शामली (उत्तरप्रदेश) येथे कुख्यात गुंड जबरूद्दीन याला अटक केल्यामुळे पोलिसांवर मुसलमानांचे आक्रमण !

अशा कायदाद्रोह्यांवर उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे ! ज्या प्रमाणे गुंड आणि त्यांना साहाय्य करणारे यांची अवैध घरे पाडली जात आहेत, तसेच या लोकांवरही कारवाई व्हावी, असेच जनतेला वाटते !

‘प्रॉव्हिडंड फंड’वरील व्याजदरात वाढ !

केंद्रशासनाच्या ‘सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज’च्या बैठकीत  कर्मचार्‍यांच्या प्रॉव्हिडंड फंड (पी.एफ्.) रकमेवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे वृत्त ‘फायनान्शिअल एक्सप्रेस’ने दिले आहे. देशभरात सध्या जवळपास ५ कोटी पी.एफ्. खातेधारक असून त्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

‘राहुल गांधी प्रकरणात आम्ही भारत सरकारच्या संपर्कात !’ – अमेरिका

राहुल गांधी यांची खासदारकी रहित करणे, हे भारताचे अंतर्गत प्रकरण आहे. त्याविषयी अमेरिकेने संपर्कात रहाण्याची काहीही आवश्यकता नाही.

अमेरिकेतील ‘टाइम्स स्क्वेअर’ येथे खालिस्तान समर्थकांकडून मोर्चा !

अशा भारतद्वेष्ट्यांवर कठोर कारवाई होण्यासाठी भारताने अमेरिकेस भाग पाडले पाहिजे !

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राहुल गांधी यांना क्षमा मागण्यास भाग पाडले पाहिजे ! – रणजीत सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान

राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात चैत्र यात्रेच्या काळात नारळाची विक्री करण्यास आणि वाढवण्यास मनाई !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !
असे निर्णय अन्य धर्मियांच्या उत्सवांच्या वेळी घेण्याचे धाडस प्रशासन दाखवणार का ?

देहू संस्थानच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम मोरे यांची निवड

देहू येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम मोरे यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत पुरुषोत्तम मोरेंनी उमेश मोरेंचा अवघ्या ९ मतांनी पराभव केला.

तासगाव (जिल्‍हा सांगली) येथे आरोग्‍य साहाय्‍य समितीच्‍या वतीने ‘जीवन संजीवनी’ (कोल्‍स) प्रशिक्षण !

हिंदु जनजागृती समितीच्या आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने अचानक येणार्‍या हृदयविकार झटक्यावर प्राथमिक उपचार देण्यासाठी ‘कोल्स’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ अनेक प्रशिक्षणार्थींनी घेतला. या प्रसंगी आधुनिक वैद्या (श्रीमती) मृणालिनी भोसले उपस्थित होत्या.

लांजा येथे ‘हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, राजापूर’ यांच्या ‘हिंदु पंचांग दिनदर्शिके’चा प्रकाशन सोहळा मंगलमय वातावरणात साजरा !

चैत्र शुक्ल पंचमीला (२६ मार्चला) येथील बसवेश्वर सदनात हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, राजापूर प्रकाशित मराठी महिन्यांची हिंदु पंचांग दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा झाला.