नवनाथांचा पदोपदी लाभणारा आधार अनुभवत जीवनाचा आनंद घ्या ! – मिलिंद चवंडके, अभ्यासक, नाथ संप्रदाय

कलियुगात मानवांना शाश्वत सुखाचा आधार देण्याकरिता नवनारायणांनी नवनाथ म्हणून अवतार घेतले. अलौकिक सामर्थ्याचे दर्शन घडवत नवनाथांनी जीवनोपयोगी संदेश दिले. हे संदेश आपणास आजही पदोपदी मार्गदर्शक ठरतात.

पुणे येथे ‘अटल भूजल राष्ट्रीय कार्यशाळे’त ७ राज्यांचा सहभाग !

केंद्र सरकार पुरस्कृत ‘अटल भूजल योजने’अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘अटल भूजल राष्ट्रीय कार्यशाळे’त देशातील ७ राज्यांतील १३५ अधिकार्‍यांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेत अटल भूजल योजनेशी संबंधित अधिकारी आणि विषयतज्ञ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आनेवाडी पथकर नाक्यावर स्थानिकांकडून पथकर मुक्तीची मागणी !

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग निर्माण करत असतांना अनेक शेतकर्‍यांनी आपल्या भूमी महामार्गासाठी दिल्या. तरीही स्थानिक नागरिकांना पथकरातून मुक्ती दिली जात नसल्याने स्थानिक ग्रामस्थ आनेवाडी पथकरनाका व्यवस्थापनाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.

सातारा येथे भाजपच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारा’ आंदोलन !

मोदी आडनावावरून टीका करतांना ओबीसी समाजाचा अपमान करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात सातारा येथे भाजपच्या वतीने ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले.

पुणे येथील टपाल खात्यातील अधिकार्‍यांकडून २४ लाख रुपयांचा अपहार !

टपाल खात्यातील योजनांमध्ये ठेवीदारांकडून जमा करण्यात आलेल्या रक्कमेवरील २४ लाख रुपये कमिशनचा अपहार टपाल खात्यातील अधिकार्‍यांनी केल्याचे उघड झाले आहे.

जिल्ह्यात येणार्‍या पर्यटकांना पोलिसांकडून कोणताही त्रास होणार नाही ! – प्रवीण पवार, महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण अतिशय अल्प आहे. ही कौतुकाची गोष्ट आहे. याचे सर्व श्रेय जिल्ह्यातील नागरिकांना आहे;  मात्र बाहेरील लोक येऊन या ठिकाणी गुन्हे करतात. हे प्रमाण रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील.

कांदोळी-कळंगुट परिसरात ९४ टक्के ‘शॅक’ अवैध !

‘शॅक’संबंधी एका याचिकेवरून गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही माहिती दिली. ‘अवैध व्यवसायावर कोणती कारवाई करणार ?’, असा प्रश्न खंडपिठाने पर्यटन खाते आणि गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना विचारला आहे.

मोगलांचे उदात्तीकरण करणार्‍या ‘ताज : डिव्‍हाइडेड बाय ब्‍लड’ या वेब सिरीजवर बंदी घाला !

सासवड (पुणे) येथे ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलना’द्वारे हिंदूंची एकमुखी मागणी !

हिंदूंच्या ज्योतिषशास्त्राचे माहात्म्य !

‘कुठे पुढील काही वर्षांत काय होणार, याचा अंदाज बुद्धीचा वापर करून सांगणारे पाश्चात्त्य, तर कुठे युगायुगांच्या संदर्भात सांगणारे ज्योतिषशास्त्र !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अमेरिकेत भारतीय वंशाच्‍या मुलीची हत्‍या करणार्‍याला १०० वर्षांची शिक्षा !

भारतीय वंशाच्‍या ५ वर्षीय माया पटेल या मुलीची हत्‍या केल्‍याच्‍या प्रकरणी जोसफ ली स्‍मिथ या ३५ वर्षीय व्‍यक्‍तीला १०० वर्षांची शिक्षा ठोठावण्‍यात आली आहे.