साधकांनो, ‘योग्य विचारप्रकियेसह परिपूर्ण कृती करणे’, हे साधनेचे समीकरण असल्याने त्याप्रमाणे प्रयत्न करून साधनेतील निखळ आनंद अनुभवा !
प्रत्येक व्यक्तीवर अनेक जन्मांचे संस्कार असतात आणि त्यानुसार तिची विचारप्रक्रिया अन् वर्तन होत असते. काही साधकांच्या मनामध्ये साधनेची तळमळ असते; परंतु स्वभावदोष आणि अहं यांमुळे कृतीत चुका राहिल्याने कृती अयोग्य होते.