बनावट मद्यविक्री करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्‍यात येईल ! – शंभूराज देसाई, उत्‍पादन शुल्‍क मंत्री

अवैध आणि बनावट मद्यविक्रीचे प्रकार घडणे, हा अतिशय गंभीर गुन्‍हा असून यातील मुख्‍य आरोपीला अटक करून त्‍यांच्‍यावर कठोरात कठोर कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणी राज्‍याचे माजी उपमुख्‍यमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

कसली बसस्थानक स्वच्छता मोहीम ? सावंतवाडी बसस्थानकात उघड्यावरच फेकला जातो कचरा !

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एस्.टी. महामंडळाकडून बसस्थानक स्वच्छता मोहीमेची घोषणा करण्यात आली असली, तरी सावंतवाडी बसस्थानक पाहिल्यास ‘स्वच्छता मोहीम आणि सावंतवाडी बसस्थानक यांचा संबंध काय ?’ असा प्रश्‍न पडावा, इतकी अस्वच्छता या बसस्थानकावर आहे.

राज्‍यातील खासगी माध्‍यमिक शाळा चालवायला सरकार सिद्ध आहे ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

राज्‍यातील प्राथमिक, माध्‍यमिक आणि माध्‍यमिक खासगी शाळांना वेतनेतर अनुदान द्यावे, यासाठी विधान परिषदेत उपस्‍थित केलेल्‍या तारांकित प्रश्‍नावर शिक्षणमंत्र्यांनी वरील सिद्धता दर्शवली.

कोंढवा (जिल्‍हा पुणे) येथील अवैध पशूवधगृहावर धाड !

कोंढव्‍यासारख्‍या मुसलमानबहुल भागातील गोवंशियांच्‍या होणार्‍या हत्‍या रोखण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्रच हवे !

शेतकर्‍यांच्‍या प्रश्‍नांवरून विधानभवनाच्‍या पायर्‍यांवर विरोधकांचे आंदोलन !

महाविकास आघाडीच्‍या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्‍या नेतृत्‍वाखाली हे आंदोलन केले.

हिंदूंची संपत्ती हडपण्‍याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्‍फ कायदा’ रहित करा ! – हुपरी (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनात हिंदूंची मागणी

आंदोलन झाल्‍यावर पोलीस उपनिरीक्षक पंकज गिरी आणि हुपरी नगर परिषद प्रशासकीय अधिकारी क्षितिज देसाई यांनी आंदोलनस्‍थळी येऊन निवेदन स्‍वीकारले.

‘वॉटर व्‍हेंडिंग मशीन’च्‍या दुरवस्‍थेची छायाचित्रे पाठवून रेल्‍वे प्रशासनाला सहकार्य करा !

प्रवाशांच्‍या सोयीसाठी आवश्‍यक असलेली ‘वॉटर व्‍हेंडिंग मशीन’ चालू होण्‍यासाठी रेल्‍वे प्रशासनाला सहकार्य करा !

महाराष्‍ट्रात हिंदु देवस्‍थानांच्‍या भूमींची लूट चालू आहे ! – आमदार जयंत पाटील, राष्‍ट्रवादी काँग्रेस

संत भूमी असलेल्‍या महाराष्‍ट्रात हिंदु देवस्‍थानांच्‍या भूमींची लूट होणे, हा मंदिर सरकारीकरणाचा दुष्‍परिणाम !

काँग्रेसचा राजकीय अंत आवश्‍यक !

काँग्रेसने यापूर्वी श्रीरामाचे अस्‍तित्‍व नाकारत रामसेतू तोडण्‍याचा घाट घातला. हेही लक्षात घेत हिंदूंच्‍या देवतांच्‍या अवमानाच्‍या विरोधातही कठोर होत त्‍यांच्‍याविषयी अधिकाधिक माहिती शाळा आणि महाविद्यालये यांतून शिकवणे आवश्‍यक आहे. तरच पुढच्‍या पिढीमध्‍ये देवतांविषयी अधिक भाव निर्माण होईल.

बलीदानमासाच्‍या निमित्ताने आयोजित रक्‍तदान शिबिरात १०४ जणांचे रक्‍तदान !

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान कोल्‍हापूर शहर विभागाच्‍या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलीदानमासाच्‍या निमित्ताने १९ मार्चला रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते.