बलीदानमासाच्‍या निमित्ताने आयोजित रक्‍तदान शिबिरात १०४ जणांचे रक्‍तदान !

कोल्‍हापूर – श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान कोल्‍हापूर शहर विभागाच्‍या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलीदानमासाच्‍या निमित्ताने १९ मार्चला रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते. यात १०४ जणांनी रक्‍तदान केले. या वेळी शहर कार्यवाहक श्री. आशिष लोखंडे, सर्वश्री सुमेध पोवार, अवधुत चौगुले, रोहित अतिग्रे, अभिषेक खडके यांसह अन्‍य धारकरी उपस्‍थित होते.