श्री संत वेणास्‍वामी मठाच्‍या वतीने गुढीपाडवा ते श्रीरामनवमी या कालावधीत विविध कार्यक्रम !

गुढीपाडव्‍याच्‍या दिवशी दुपारी ४ वाजता भव्‍य शोभायात्रेचे आयोजन करण्‍यात आले आहे. सर्व उपक्रमांचा हिंदु बांधवांनी तन-मन-धन यांद्वारे सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पारंपरिक मासेमारांची हानी टाळण्यासाठी प्रकाशझोतातील मासेमारीवर बंदी आणावी !

मंत्री मुनगंटीवार यांनी आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विषय योग्य पद्धतीने हाताळले आहेत. त्यामुळे एल्.ई.डी. मासेमारीचा विषय त्याच पद्धतीने हाताळावा आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांतील पारंपरिक मासेमारांची यातून सुटका करावी.

पुणे येथील वाहतूक समस्‍या सोडवण्‍याकरता सार्वजनिक वाहतूक सक्षम करायला हवी ! – वाहतूकतज्ञ

बसेसची संख्‍या वाढवावी लागेल. लोकांना घरातून बाहेर पडल्‍यानंतर ५ ते ७ मिनिटांमध्‍ये बस थांबा गाठता यायला हवा, तसेच थांब्‍यावर पोचल्‍यावर ५ मिनिटाच्‍या अंतराने बस उपलब्‍ध हव्‍यात. बस किती वेळात येणार आणि ती सध्‍या कुठे आहे याची माहिती देणारी यंत्रणा उभी करावी लागेल.

गोवा : कारका (बांबोळी) येथे मासेमारांच्या ४ होड्या आगीत जळून खाक : लाखो रुपयांची हानी

यामागे काहीतरी घातपात असल्याचा संशय या होड्यांच्या मालकांनी व्यक्त केला असून होड्यांना आग लागण्याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. या दुर्घटनेमध्ये जवळपास ३ लाख रुपयांची हानी झाली आहे.

विधानसभा अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करणार; पण चर्चा नंतर ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

‘‘अधिवेशनामध्ये कोणत्या दिवशी अर्थसंकल्प सादर करणार, याचा दिनांक निश्चित झालेला नाही. विधानसभेचे अधिवेशन २७ मार्च ते ३१ मार्च या ५ दिवसांत घेण्यात येणार होते; परंतु ३१ मार्च या दिवशी रामनवमी असल्याने अधिवेशन ४ दिवस करण्यात आले.’’

गोव्यात ‘एच् ३ एन् २’बाधित २ रुग्ण : सामाजिक स्वच्छता सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

देशात, तसेच गोवा राज्यात पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.  या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा संचालनालयाने नागरिकांना कोरोना पसरू नये यासाठी सामाजिक अंतर नियमांचे सतर्क राहून पालन करण्यास सांगितले आहे.

वेलसाव (गोवा) येथे रेल्वेच्या कामगारांवर दगडफेक

हिंसक मार्ग अवलंबणार्‍यांना सामाजिक कार्यकर्ते म्हणता येईल का ?

भारतासाठी ही शोकांतिकाच !

‘बंदुका, दारूगोळा, विमाने इत्यादी सर्व वस्तू आयात करता येतील; पण राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नेते कुठून आयात करता येतील ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पुणे येथे पी.एम्.पी.एम्.एल्.चे चालक आणि वाहक यांना मारहाणीच्‍या घटनांमध्‍ये वाढ !

अशी आक्रमणे करणार्‍यांवर तात्‍काळ कठोर कारवाई का केली जात नाही ? कारवाईची जरब बसल्‍यास अशी आक्रमणे करण्‍याची कुणाची हिंमत होणार नाही.

सोलापूर शहरात गुढीपाडव्‍याला २ ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन !

बाळीवेस येथून पहिली शोभायात्रा, तर जुळे सोलापूर येथील आसरा चौकातून दुसरी शोभायात्रा दुपारी ४.३० वाजता निघेल, अशी माहिती समितीचे संस्‍थापक रंगनाथ बंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.