इक्वेडोरमध्ये ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप : १३ जणांचा मृत्यू

क्विटो – इक्वेडोर या दक्षिण अमेरिकन देशात १९ मार्च या दिवशी ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात १३ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाचा सर्वाधिक फटका इक्वेडोरमधील ग्वायास या भागाला बसला. ग्वायास हा इक्वेडोरचा किनारी भाग आहे. येथून ८० किमी अंतरावर असलेल्या ग्वायाकिल शहरात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे.

पेरू देशालाही हादरे !  

इक्वेडोरमधील भूकंप इतका शक्तीशाली होता की, त्याचे धक्के शेजारील देश असलेल्या पेरूतही जाणवले. येथेही अनेक घरे उद्ध्वस्त झाली, तर एकाचा मृत्यू झाला आहे.