(म्हणे) ‘केवळ भारतीय लोकशाहीविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले; म्हणून मला देशद्रोही म्हणता येणार नाही !’ – काँग्रेसचे नेते राहुल गांधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे संतापजनक विधान !

काँग्रेसचे नेते राहुल गांधी

नवी देहली – मी केवळ भारतीय लोकशाहीविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले; म्हणून मला देशद्रोही म्हणता येणार नाही’, असे विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले. गांधी यांनी १ मार्च या दिवशी केंब्रिज विद्यापिठात केलेल्या भाषणात भारताच्या लोकशाहीविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते.

या वक्तव्याविषयी राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्रालय समितीच्या बैठकीत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, माझे भाषण कुठलाही देश किंवा सरकार यांच्या संदर्भात नव्हते. ते एका व्यक्तीच्या संदर्भात होते. मी भारताच्या लोकशाहीविषयी काही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. या सूत्रावर अन्य कुठल्याही देशाला हस्तक्षेप करण्यास सांगितलेले नाही. यासाठी मला देशद्रोही म्हणता येणार नाही.

संपादकीय भुमिका

  • यावरून ‘काँग्रेसच्या लोकांमध्ये देशद्रोह इतका ठासून भरला आहे की, त्यांना विदेशात जाऊन देशाचा अवमान करणे, हाही देशद्रोह वाटत नाही’, हे यावरून लक्षात येते !
  • विदेशात जाऊन देशाचा अपमान करणार्‍यांना देशात रहाण्याचा काडीचा तरी अधिकार आहे का ?