अजमेर दर्ग्याला मिळणार्‍या अर्पणामध्ये भ्रष्टाचार ! – सेवेकरी

सेवेकर्‍यांकडून दर्गा समितीची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी करण्याची मागणी !

अजमेर (राजस्थान) – येथील ख्वाजा मोइनुद्दीन हसन चिश्ती दर्ग्याचे खादिम (सेवेकरी) आणि दर्गा समितीचे सदस्य यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. खादिमांनी या समितीच्या सदस्यांवर दर्ग्याला मिळणार्‍या अर्पणावरून भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडीकडून) या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात अजमेरच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या ५ वर्षांपासून येथे येणार्‍या भाविकांना समितीने कोणतीही सुविधा पुरवलेली नाही. दर्ग्याचे छत तुटलेले आहे. फरशांचीही अशीच स्थिती आहे. सर्वत्र अस्वच्छता आहे. त्यामुळे येणार्‍या भाविकांना त्रास सहन करावा लागतो. लोकांनी दान केलेल्या पैशामध्ये हेराफेरी केली जात आहे. दर्ग्याच्या संपत्तीचा दुरुपयोग केला जात आहे. राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दर्गा समितीने प्रतिक्षालय उघडलेले नाही.

संपादकीय भूमिका 

हिंदूंच्या मंदिरांचे सरसकट सरकारीकरण करणारी सर्वपक्षीय सरकारे अशा दर्ग्यांचे सरकारीकरण करण्याचे धाडस दाखवतील का ?