अभिनेता शिझान खानला जामीन

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणात गेल्या दोन मासांपासून अटकेत असलेला तिचा प्रियकर आणि अभिनेता शिझान खान याला न्यायालयाने जामीन संमत केला आहे. न्यायालयाने शिझानला एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन संमत केला आहे.

केंद्र सरकारचे महामार्ग, रेल्वे, पेट्रोलियम आदींच्या योजना प्रलंबित ! – सरकारचाच अहवाल

रस्ते परिवहन आणि महामार्ग क्षेत्रातील ७४९ पैकी सर्वाधिक ४६० योजना प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच प्रमाणे रेल्वेच्या १७३ पैकी ११७ आणि पेट्रोलियम क्षेत्राशी संबंधित १५२ पैकी ९० योजनांना विलंब होत आहे.

मुसलमान हे मुसलमान देशांत असुरक्षित, तर सभ्य देशांत सुरक्षित !-तस्लिमा नसरीन

सुन्नी मुसलमान बहुसंख्य असणार्‍या मुसलमान देशांत शिया मुसलमानांचा छळ केला जातो, तर शिया मुसलमान बहुसंख्य असणार्‍या मुसलमान देशांत सुन्नी मुसलमानांचा छळ केला जातो.

गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) येथे मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने २५ जण घायाळ !

गेल्या २ दिवसांपासून गांधीनगर येथे मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी २५ जणांचा चावा घेतला आहे. यांतील काही जणांवर गांधीनगर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ग्रामस्थांनी याविषयी वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही.

आकाशात उडून शत्रूवर लक्ष ठेवू शकणार्‍या सैनिकांच्या ‘जेटपॅक फ्लाईंग सूट’ची चाचणी

सध्या भारतीय सैन्य पूर्व लडाख सीमेच्या वादानंतर चीनच्या ३५०० कि.मी. नियंत्रण रेषेवर (एल्.ए.सी.) संपूर्ण पाळत ठेवत आहे. दुर्गम सीमाभागात शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय सैन्याने ब्रिटीश आस्थापनाकडून ‘जेटपॅक फ्लाईंग सूट’ मागवले आहेत.

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे होळीच्या वर्गणीवरून मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !

एक मुसलमान नगरसेवक हिंदूंना इस्लाम स्वीकारण्यास सांगत असेल, तर उद्या देशातील धर्माभिमानी हिंदु लोकप्रतिनिधींनी धर्मांतरित मुसलमानांना हिंदु धर्मांत पुनर्प्रवेश करण्यास सांगितले, तर त्याला चुकीचे कुणी म्हणेल का ?

(म्हणे) ‘मी ब्रिटनमध्ये बोलू शकतो; पण भारतीय संसदेत चीनच्या घुसखोरीचे सूत्र उपस्थित करण्याची अनुमती नाही !’-राहुल गांधी

भारतातील अर्ध्याहून अधिक राज्यांत भाजप अथवा भाजपसमर्थित सरकार असतांना आणि काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ही यांपैकी ६ राज्यांतून निर्विघ्नपणे गेलेली असतांना राहुल गांधी यांच्या या विधानावर एखादे शेंबडे पोर तरी विश्‍वास ठेवील का ?

भारतातील स्वित्झर्लंडच्या राजदूतांना देण्यात आली समज !

राल्फ हेकनर यांनी ‘भारताची भूमिका स्वित्झर्लंड सरकारला कळवण्यात येईल’, असे आश्‍वासन दिल्याचेही सांगण्यात आले. याविषयी सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

गोवा : ४ वर्षांत विधानसभेचे कामकाज प्रतिवर्षी सरासरी १५ दिवसच झाले !

लोकशाहीमध्ये सकारात्मक चर्चा करून लोकांच्या समस्या सोडवायच्या असतात; मात्र अधिवेशनाचा कालावधी घटवल्याने अधिवेशन बोलावण्याचा उद्देशच नष्ट होत आहे.

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात बंदीवानांकडून भ्रमणभाष संच कह्यात !

पहारा आणि अनेक तपासण्या असतांना कारागृहात या वस्तू कशा जातात ? कामचुकारपणा केल्याच्या प्रकरणी अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी !