केंद्र सरकारचे महामार्ग, रेल्वे, पेट्रोलियम आदींच्या योजना प्रलंबित ! – सरकारचाच अहवाल

प्रतिकात्मक चित्र

नवी देहली – रस्ते परिवहन आणि महामार्ग क्षेत्रातील ७४९ पैकी सर्वाधिक ४६० योजना प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच प्रमाणे रेल्वेच्या १७३ पैकी ११७ आणि पेट्रोलियम क्षेत्राशी संबंधित १५२ पैकी ९० योजनांना विलंब होत आहे. केंद्र सरकारच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारचा आय.पी.एम्.डी. विभाग १५० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या योजनांवर लक्ष ठेवतो. त्याने दिलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.