तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण
मुंबई – अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणात गेल्या दोन मासांपासून अटकेत असलेला तिचा प्रियकर आणि अभिनेता शिझान खान याला न्यायालयाने जामीन संमत केला आहे. न्यायालयाने शिझानला एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन संमत केला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तुनिषा शर्माच्या आत्महत्येच्या आरोपाखाली शिझानला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत होता. हे प्रकरण लव्ह जिहादचे असल्याचा आरोप अनेकांनी केला होता.
Maharashtra | Television actor Sheezan Khan accused in television actress Tunisha Sharma’s suicide case released on bail from Thane Central Jail today pic.twitter.com/KWRSwIYNtD
— ANI (@ANI) March 5, 2023