आकाशात उडून शत्रूवर लक्ष ठेवू शकणार्‍या सैनिकांच्या ‘जेटपॅक फ्लाईंग सूट’ची चाचणी

‘जेटपॅक फ्लाईंग सूट’ घातलेला सैनिक

आग्रा (उत्तरप्रदेश) – सध्या भारतीय सैन्य पूर्व लडाख सीमेच्या वादानंतर चीनच्या ३५०० कि.मी. नियंत्रण रेषेवर (एल्.ए.सी.) संपूर्ण पाळत ठेवत आहे. दुर्गम सीमाभागात शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय सैन्याने ब्रिटीश आस्थापनाकडून ‘जेटपॅक फ्लाईंग सूट’ मागवले आहेत. ते घालून भारतीय सैनिक पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडून टेहाळणी करू शकणार आहेत. या संदर्भातील चाचणी नुकतीच उत्तरप्रदेशातील आग्रा येथील इंडियन आर्मी एअरबोर्न ट्रेनिंग स्कूल (ए.ए.टी.एस्.)मध्ये करण्यात आली. हा सूट धारण करून १२ सहस्र फूट उंचीवर जाता येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या चाचणीच्या वेळी वेळी सैनिकाने ५१ किलोमीटर अंतर कापले. या सूटमध्ये तीन लहान जेट इंजिन असतात. त्यामुळे सैनिक त्यांच्या हालचाली आणि उड्डाणाची दिशा नियंत्रित करू शकतो.

‘ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीज्’ या ब्रिटीश आस्थापनाने हे सूट विकसित केले आहेत. भारतातही अशा प्रकारे सूट निर्माण करण्याची प्रक्रिया चालू आहे.