राष्ट्रीय जलमार्गामुळे पणजी ते वास्को अंतर २० मिनिटांत कापता येणार !

पणजी ते वास्को हे अंतर ३२ किलोमीटर असून ते पार करण्यासाठी ४५ मिनिटे लागत. रस्ता वाहतुकीवरील ताण न्यून करण्यासाठी सरकार जलमार्गाचा अधिक वापर करण्यावर भर देत आहे.

केरळमधील ‘एशियानेट न्यूज’ वृत्तवाहिनीच्या कार्यालयावर केरळ पोलिसांची धाड

बीबीसीच्या कार्यालयांचे आयकर विभागाने सर्वेक्षण केल्यावर थयथयाट करणारे ‘एशियानेट’विषयी गप्प आहेत. यातून त्यांची दुटप्पी भूमिका लक्षात येते !

गुजरातमधील शक्तिपीठ असणार्‍या अंबाजीमाता मंदिरातील प्रसाद ‘मोहनथाळ’ बंद केल्याने वाद !

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर याहून वेगळे काय होणार ? गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ ‘मोहनथाळ’ प्रसाद म्हणून दिली जात असतांना अचानक ती बंद करणे ही मोगलाईच होय ! हिंदूंची मंदिरे भक्तांच्या नियंत्रणात असण्यासाठी आता हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍यांना अटक !

हिंदूंच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये त्यांनी कधी अन्य धर्मियांचे धर्मांतर केलेले नाही; मात्र जगात सर्वाधिक धर्मांतर हिंदूंचेच करण्यात आले आहे. याला हिंदूंचा नेभळटपणाच उत्तरदायी आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

बांगलादेशात दुर्गादेवीच्या मंदिरावर अतिरेकी मुसलमानांचे आक्रमण !

ढाका येथील ठाकूरगाव जिल्ह्यात असलेल्या रुहिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्गादेवीच्या मंदिरावर अतिरेकी मुसलमानांनी आक्रमण केले.

महामार्गाच्या रुंदीकरणात जात असलेला बंगला नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मागे सरकवण्याचा निर्णय !

नवीन तंत्रज्ञानानुसार या बंगल्याची कोणतीही मोडतोड न करता, तो आहे त्या स्थितीत मागे नेण्याचे काम चेन्नई येथील आस्थापन करणार आहे.

इराणमध्ये पालकांनी सरकारच्या विरोधात केली आंदोलने !

इराणमध्ये शालेय शिक्षण घेणार्‍या ९०० हून अधिक विद्यार्थिनींना विष दिल्याचे प्रकरण अधिक जटील होत चालले आहे. देशात काही ठिकाणी या प्रकरणी विद्यार्थिनींच्या पालकांनी आंदोलने केली. या वेळी त्यांनी ‘विषबाधा करणारे  इस्लामिक स्टेटप्रमाणे आहेत’, असे म्हटले.

‘सीसीटीव्ही’ कॅमेर्‍यांच्या माध्यमातून चीन हेरगिरी करत असल्याने त्यांवर बंदी आणा !

चीनने केवळ सीमेवरच भारताला धोका दिला असे नाही, तर त्याने देशातील माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित पायाभूत सुविधांवरही आक्रमण केले आहे. चिनी बनावटीच्या ‘सीसीटीव्ही’ कॅमर्‍यांवर बंदी आणली पाहिजे.

खेड येथील उद्धव ठाकरे यांच्या सभेविषयी शिवसेना नेते रामदास कदम यांचे उद्गार !

उद्धव ठाकरे यांनी आमचा धसका घेतला आहे. त्यामुळे खेडमध्ये बाहेरची माणसे आणून विराट सभेचा दिखावा केला जात आहे. त्याच मैदानात सभा आम्ही १९ मार्चला घेणार असून या सभेला व्याजासहित उत्तर देऊ.

काश्मिरात ३४ वर्षांनंतर २०० चित्रपटांचे चित्रीकरण !

भारत शासन काश्मिरी जनतेवर अत्याचार करत असल्याची आवई उठवणार्‍या ‘बीबीसी’, ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ यांसारख्या पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांना आता या घटनेवरून जाब विचारणे आवश्यक !