रामरक्षा ही मानवाच्या शरिराच्या व्याधींवरील औषधी ! – वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले

रामरक्षा म्हटल्यावर हीच रामरक्षा आपल्या शरिरावर औषधासारखे काम करू शकते; कारण या स्तोत्रामध्ये रामाविषयी लावलेली अनेक विशेषणे आपल्या शरिराच्या विविध भागांवर त्याचे उच्चारण केले असता औषधासारखे काम करतात, असे प्रतिपादन वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांनी केले.

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्र’वाल्यांनी जुनैद आणि नासीर यांना मारले !’ – असदुद्दीन ओवैसी यांचा आरोप

भारताला इस्लामी देश बनवणार्‍यांनी काश्मीरमध्ये काय केले ? याविषयी ओवैसी कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

शिवजयंती निमित्त शहापूर येथे कवी संमेलनाचे आयोजन

शहापूर येथील जनक्रांती संघटना ,ग्रामसाप, साप्ताहिक शिवमार्ग आणि लोक हिंद चॅनेलच्या वतीने १९ फेब्रुवारी २०२३ या दिवशी रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत शिवजयंती निमित्ताने “प्रिय शिवबास…”या नावाने काव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

अमेरिकेला भारतीय वंशाचे राष्ट्राध्यक्ष मिळण्याची शक्यता !

भारतीय वंशाच्या निक्की हेली यांनी रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारासाठीची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही यावर दावा केला आहे. त्यामुळे आता रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होण्यासाठी ट्रम्प आणि निक्की यांच्यात लढत होणार आहे.

अदानी प्रकरणात मोदी यांना उत्तर द्यावे लागेल !’ – जॉर्ज सोरोस, अमेरिकी अब्जाधीश

अमेरिकेतील राजकीय पक्ष आणि उद्योजक यांचे हितसंबंध अन् त्यामुळे होणारे लाभ ही काही नवीन गोष्ट नाही ! सोरोस यांनी भारतातील राजकीय आणि उद्योजक यांच्या हितसंबंधांवर भाष्य करत वेळ घालवण्यापेक्षा यावर भाष्य करून तेथील परिस्थिती पालटण्याचा प्रयत्न करावा !

जागतिक स्तरावर भारताची सर्वांत मोठी आणि गतीशील आर्थिक वृद्धी  निश्चित होणार !

आता, रे डालियो यांना आता कुणा धर्मनिरपेक्ष उपटसुंभाने ‘भाजपचा एजंट’ म्हटले, तर आश्चर्य वाटायला नको !

भाजप सरकारकडून मंदिर आणि मठ यांच्या विकासासाठी १ सहस्र कोटी रुपयांची तरतूद

कर्नाटकातील भाजप सरकारने राज्याचा वर्ष २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात राज्यातील रामनगर येथे भव्य श्रीराममंदिर बांधण्यात येणार असल्याचेही घोषित केले आहे !

अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग ! – खासदार जेफ मर्कले आणि बिल हागेर्टी

हिंद आणि प्रशांत महासागर यांच्या स्वातंत्र्यासाठी चीन संकट ठरू पहात आहे, अशा वेळी अमेरिकेला त्याच्या राजकीय सहकार्‍यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून उभे रहाण्याची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे भारतासमवेत !

शिवसेनेच्या आमदारांचा खटला मोठ्या खंडपिठापुढे चालवण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार !

त्यामुळे हा खटला आता ५ न्यायाधिशांच्या खंडपिठापुढेच चालणार आहे. याची पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी या दिवशी होणार आहे.

(म्हणे) ‘भजनास आमंत्रित गायक कट्टर हिंदु असल्याने हिंसा करू !’ – खलिस्तानवादी, ऑस्ट्रेलिया

मेलबर्न येथे गेल्या काही आठवड्यांत ऑस्ट्रेलियातील ३ हिंदु मंदिरांवरील आक्रमणांच्या घटना समोर आल्यानंतर आता येथील काली माता मंदिरातील महिला पुजार्‍याला धमकी दिल्याची माहितीही समोर आली आहे.