(म्हणे) ‘हिंदु राष्ट्र’वाल्यांनी जुनैद आणि नासीर यांना मारले !’ – असदुद्दीन ओवैसी यांचा आरोप

खासदार ओवैसी

भाग्यनगर – जुनैद आणि नासीर यांना हिंदु राष्ट्र बनवणार्‍यांनी मारले आहे. गोरक्षणाच्या नावाखाली चालणार्‍या एका संघटित टोळीने या दोघांना मारले आहे. याला हरियाणातील भाजप सरकार उत्तरदायी आहे; कारण सरकार या टोळीला संरक्षण देत आहे, असा आरोप एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. ओवैसी पुढे असेही म्हणाले की, या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही बोलणार आहेत का ? मला इतका विश्वास आहे की, पीडितांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार नाही, असा दावाही त्यांनी केला. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

संपादकीय भूमिका

  • भारताला इस्लामी देश बनवणार्‍यांनी काश्मीरमध्ये काय केले ? याविषयी ओवैसी कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • हिंदु राष्ट्र बनवणारे असे करत राहिले असते, तर एव्हाना भारत हिंदु राष्ट्र झाले असते !