टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा

नोएल टाटा

मुंबई – उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर ‘टाटा ट्रस्ट’च्या अध्यक्षपदाचे दायित्व त्यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांच्याकडे देण्यात आले आहे.

रतन टाटा यांच्या निधनानंतर मुंबई येथे टाटा समुहाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. टाटा समुहाच्या सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट या आस्थापनांच्या प्रमुखपदी नोएल टाटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवल टाटा यांनी स्वित्झर्लंड येथील उद्योजिका सिमोन यांच्याशी दुसरा विवाह केला होता. नोएल टाटा हे त्यांचे पुत्र आहेत. नोएल यांनी इंग्लंडमधील ससेक्स विद्यापिठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.

टाटा समुहाच्या टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, व्होल्टास लिमिटेड, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या आस्थापनांचे ते अध्यक्ष आहेत. ट्रेंट लिमिटेडचे ते सलग ११ वर्षे व्यवस्थापकीय संचालक होते.