राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा शासकीय शिवजयंतीवर बहिष्कार !

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असतांना अद्याप शिवनेरीवर भगवा ध्वज कायमस्वरूपी फडकवला नाही. वर्ष २०२१ पासून अनेक मंत्री आणि वरिष्ठ नेते यांना भेटून मी शिवनेरीवर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावण्याची मागणी करत आहे.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने सोलापूर विभागातून अधिकच्या ९० गाड्या सोडण्यात येणार ! – दत्तात्रय कुलकर्णी, आगारप्रमुख, सोलापूर

‘‘विभागात २० नवीन बसगाड्या आल्या असून त्या लांब पल्ला आणि मध्यम पल्ला या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत, तसेच इलेक्ट्रीक बससाठी ‘चार्जिंग स्टेशन’ उभारणीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.’’ 

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील ‘हिंदु गर्जना मोर्चा’साठी ५ सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती !

फाल्गुन अमावास्येला छत्रपती संभाजी महाराज ‘बलीदानदिन’ घोषित करण्यात यावा, या मागण्यासांठी ईश्वरपूर येथे १७ फेब्रुवारीला झालेल्या ‘हिंदु गर्जना मोर्चा’साठी ५ सहस्रांहून अधिक हिंदू उपस्थित होते.

खासदार नवनीत राणा यांच्या वडिलांची याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली !

शिवडी महानगर दंडाधिकार्‍यांनी फरार घोषित केल्याच्या निर्णयाला खासदार नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंह कुंडलेस यांनी मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. स्वत:ला ‘फरार’ घोषित करण्याची प्रक्रिया थांबवण्याची मागणी कुंडलेस यांनी न्यायालयाकडे केली होती

नवनियुक्त राज्यपाल १८ फेब्रुवारी या दिवशी घेणार पदाची शपथ !

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस हे १८ फेब्रुवारी या दिवशी दुपारी १२.४० वाजता राजभवन येथे पदाची शपथ घेणार आहेत. १७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५.४५ वाजता रमेश बैस मुंबईत येणार आहेत, अशी माहिती राजशिष्टाचार विभागाकडून देण्यात आली आहे.

बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर धाडी !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे यांच्या निवासस्थानी, तसेच त्यांच्या कार्यालयावर एकाच वेळी ६ ठिकाणी प्राप्तिकर विभागाने धाडी टाकल्या आहेत.

विशाळगडावरील अतिक्रमणकर्त्यांची घरे पाडण्यास १० मार्चपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती !

विशाळगड परिसरातील अतिक्रमणकर्त्यांची सुमारे १०० घरे पाडण्याच्या संदर्भात पुरातत्व विभागाने बजावलेल्या नोटिसीला मुंबई उच्च न्यायालयाने १० मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे. संरक्षित स्मारकाच्या आतील जुन्या वसाहतींवर कारवाई करण्याचे धोरण आहे का ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन संमत !

महापालिका अतिक्रमण विभागाचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती.

महाशिवरात्रीनिमित्त पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन !

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने जिल्ह्यात अनेक शिवमंदिरांमध्ये ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

‘शिवसेना’ नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला !

केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय !
‘धनुष्यबाण’ हे चिन्हही शिंदे गटाला मिळाले !