मिरज (जिल्हा सांगली), १२ ऑक्टोबर (वार्ता.) – सज्जाद शिराजुद्दीन हलीमा (वय ४० वर्षे) याने रस्त्यावर फिरत असलेल्या गायीचे शिंग अकारण मोडले. वेदना सहन करत गाय परिसरात फिरत होती. ‘लोक मारतील’ या भीतीने धर्मांधाने स्वतः शहर पोलीस ठाणे गाठल्याचे समजते. शहरात सज्जाद हा माथेफिरू असल्याचे भासवले जात आहे; मात्र ‘त्याला केवळ गायच कशी दिसली ? आक्रमण करतांना गाढव, कुत्रा असे इतर प्राणी का दिसले नाहीत ? अशी चर्चा मिरजकरांमध्ये चालू आहे. (सज्जाद याला माथेफिरू म्हणून पोलिसांनी जुजबी कारवाई करून सोडून देण्याऐवजी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे ! – संपादक)
बुधवार पेठ या ठिकाणी कनवाडकर हौद या ठिकाणी नेहमीप्रमाणे गायी फिरत होत्या. भारत नेमाडे यांच्या मालकीची पांढर्या रंगाची देशी खिलार गाय याच परिसरात फिरत होती. सज्जाद हलीमा याने पांढर्या रंगाच्या खिलार गायीचे अकारण शिंग मोडले. त्यामुळे वेदनेने व्याकुळ गाय परिसरात फिरू लागली. तिला पकडण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. या वेळी सज्जाद हलीमा याच्याविषयी लोक संतप्त झाले आणि त्या वेळी ‘लोक मारतील’, या भीतीने त्याने स्वतःहून पोलीस ठाणे गाठले. पोलीस हवालदार एल्.व्ही. कौजलगी यांनी शहर पोलीस ठाण्यात हालीम याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी धर्मांधाला अटक केली कि नाही ? हे समजू शकले नाही.
संपादकीय भूमिका :गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळूनही धर्मांधांकडून गोमातेविषयी होणारी आगळीक अजून किती दिवस सहन करणार ? |