अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग ! – खासदार जेफ मर्कले आणि बिल हागेर्टी

अमेरिकेच्या २ खासदारांकडून संसदेत विधेयक सादर !

खासदार जेफ मर्कले आणि बिल हागेर्टी

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील खासदार जेफ मर्कले आणि बिल हागेर्टी यांनी अमेरिकेच्या संसदेत अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य अंग असल्याचे सांगणारे एक विधेयक सादर केले आहे. चीन गेली अनेक वर्षे अरुणाचल प्रदेशवर दावा करत आहे. त्या पार्श्वभूमीवर या विधेयकाला अधिक महत्त्व आहे.

सौजन्य : एएनआय न्यूज

१. खासदार जेफ मर्कले यांनी म्हटले की, अमेरिका संपूर्ण जगामध्ये स्वतंत्र आणि कायद्याच्या आधारे चालणार्‍या व्यवस्थेचे समर्थन करतो.

२. खासदार बिल हागेर्टी यांनी म्हटले की, हिंद आणि प्रशांत महासागर यांच्या स्वातंत्र्यासाठी चीन संकट ठरू पहात आहे, अशा वेळी अमेरिकेला त्याच्या राजकीय सहकार्‍यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून उभे रहाण्याची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे भारतासमवेत ! अमेरिका आणि भारत यांच्यातील सहकार्य अधिक भक्कम करण्याची आवश्यकता आहे.