मुंबई – एकनाथ शिंदे समर्थक शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट निर्माण झाले. या प्रकरणी शिंदे समर्थक आमदारांना अपात्र ठरवण्याविषयी ठाकरे गटाकडून सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.
शिवसेना सत्तासंघर्ष : सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी नियमीतपणे सुनावणी; आज काय घडलं?https://t.co/AyNLB5W3K9
— LoksattaLive (@LoksattaLive) February 17, 2023
हा खटला ७ न्यायाधिशांच्या खंडपिठापुढे चालवण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती; मात्र सर्वाेच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे हा खटला आता ५ न्यायाधिशांच्या खंडपिठापुढेच चालणार आहे. याची पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी या दिवशी होणार आहे. सर्वाेच्च न्यायालयात सलग ३ दिवस झालेल्या सुनावणीमध्ये दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकून झाल्यानंतर सर्वाेच्च न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला होता.