सरफराज मेमन नावाचा धोकादायक आतंकवादी मुंबईत !

तालिबानचा सदस्य असल्याचे सांगणार्‍या एका व्यक्तीने मुंबईत आक्रमण करण्याची धमकी दिली होती. तालिबानचा नेता सिराजुद्दीन हक्कानी याच्या आदेशाने तो हे करत असल्याचे त्याने सांगितले होते.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट घेणार !

विधानसभा सदस्यांच्या भावना पंतप्रधानांना सांगून त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यासाठी विनंती करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

बांगलादेशातून पलायन करून आलेले ख्रिस्ती मिझोराममध्ये फुटीरतवादी संघटनेला करत आहेत साहाय्य !

आतापर्यंत बांगलादेशी घुसखोर मुसलमानच देशात अवैध रहात असून कारवाया करत असल्याचे समोर येत असतांना आता तेथील ख्रिस्तीही भारतात येऊन भारत विरोधी कारवाया करत असल्याचे समोर येणे, हे भारतीय सुरक्षायंत्रणांना लज्जास्पद आहे !

अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कार्यवाहीसाठी अडीच कोटी रुपये निधी !

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा आणि विधान परिषद येथे वर्ष २०२२-२३ वर्षांच्या ६ सहस्र ७१ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. त्या वेळी वरील माहिती देण्यात आली.

गडांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे ! – रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी जीवनाची ओळख नवीन पिढीला करून देण्यासाठी गडांचे जतन आणि संवर्धन करण्यास माझ्या शासनाने प्राधान्य दिले आहे- राज्यपाल रमेश बैस

कराचीमध्ये काश्मिरी आतंकवाद्याची हत्या !

काश्मीरमधील आतंकवादी संघटना ‘अल्-बद्र’चा कमांडर सैयद खालिद रझा याला अज्ञातांना गोळ्या झाडून ठार केले. तो मृत्यूपर्यंत काश्मीरमध्ये सक्रीय होता. ‘सिंधुदेश रिवोल्यूशनरी आर्मी’ या संघटनेने रझा याच्या हत्येचे दायित्व घेतले आहे.

पंजाबच्या कारागृहात सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपींमध्ये झालेल्या हाणामारीत दोघांचा मृत्यू, तर तिसरा घायाळ

आप सत्तेवर असलेल्या पंजाबमध्ये सर्वत्रच कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, हे लक्षात घेता सरकारने आता तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी !

श्री महालक्ष्मीदेवीच्या तोंडवळ्यावरील भाव पूर्णपणे पालटले असून मूर्ती धोकादायक स्थितीत !  

मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा ! धर्मशास्त्रविसंगत कृती करून भाविकांना देवीतत्त्वापासून वंचित ठेवले जात असून हे थांबवायचे असेल, तर मंदिर भक्तांच्या कह्यात द्या !

पाश्चात्त्य देशांनी जी-२० चा वापर रशियाच्या विरोधात केला ! – रशियाचा आरोप

भारताने सर्व देशांचे हित आणि त्यावर निष्पक्ष विचार करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात समतोल दृष्टीकोन ठेवला होता. हा आर्थिक आणि संबंधित क्षेत्रांमधील अव्हानांना सामोरे जाण्यासाठी चांगला पाया आहे, अशा शब्दांत रशियाने भारताचे कौतुक केले.

इस्लामिक स्टेट मुसलमानांचे प्रतिनिधित्व करत नाही !

सिंगापूरच्या महिला मुसलमान राष्ट्रपती यांनी जसे विधान केले, तसे अन्य इस्लामी देशांच्या एकाही प्रमुखाने आतापर्यंत केलेले नाही, हे लक्षात घ्या !