इस्लामिक स्टेट मुसलमानांचे प्रतिनिधित्व करत नाही !

सिंगापूरच्या राष्ट्रपती हलीमा याकूब यांची स्पष्टोक्ती !

सिंगापूरच्या राष्ट्रपती हलीमा याकूब

सिंगापूर – तरुण पिढी जिज्ञासू आणि प्रभावशाली असते. यामुळे जगातील अन्य भागांमध्ये घडणार्‍या घटनांमुळे लगेच आकृष्ट होते. सिंगापूरमध्ये नकारात्मतेचा सामना करण्यासाठी आणि इस्लामिक स्टेट मुसलमानांचे प्रतिनिधित्व करत नाही, हे समजण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन सिंगापूरच्या राष्ट्रपती हलीमा याकूब यांनी सिंगापूरच्या मुसलमान जनतेला केला. त्या एका सभेत बोलत होत्या. राष्ट्रपती याकूब या येथील अल्पसंख्यांक मलय मुसलमानांच्या नेत्याही आहेत. सिंगापूरमध्ये मलय मुसलमानांची लोकसंख्या १५ टक्के आहे. नुकतेच सिंगापूरमध्ये इस्लामिक स्टेटच्या ऑनलाईन प्रसारामुळे त्याकडे आकृष्ट झालेल्या २ किशोरवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी वरील विधान केले. या २ मुलांमध्ये एका १५ वर्षीय विद्यार्थ्याचा समावेश आहे. तो चाकूद्वारे आक्रमण करून मुसलमानेतरांचा शिरच्छेद करण्याचा, तसेच आत्मघाती आक्रमणकर्ता होण्याचा विचार करत होता, असे उघड झाले होते.

राष्ट्रपती याकूब पुढे म्हणाल्या की, कट्टरतेच्या प्रकरणांमुळे चिंतेत वाढ झाली आहे. आम्हाला भीती आहे की, मुसलमानेतरांशी असलेल्या संबंधांमध्ये आणि रोजगाराच्या संदर्भात याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मला पूर्ण विश्वास आहे की, सिंगापूरमध्ये रहाणारे मुसलमान विचार करणारे आणि शांततप्रिय आहेत. ते देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देत आहेत.

संपादकीय भूमिका

सिंगापूरच्या महिला मुसलमान राष्ट्रपती यांनी जसे विधान केले, तसे अन्य इस्लामी देशांच्या एकाही प्रमुखाने आतापर्यंत केलेले नाही, हे लक्षात घ्या !