बांगलादेशातून पलायन करून आलेले ख्रिस्ती मिझोराममध्ये फुटीरतवादी संघटनेला करत आहेत साहाय्य !

ढाका (बांगलादेश) – सुमारे ५०० बांगलादेशी ख्रिस्त्यांनी चितगाव हिल ट्रॅक्ट भागात ‘जमातुल अन्सार फिल हिंदल शार्किया’ या जिहादी गटाने केलेल्या आक्रमणानंतर भारताच्या मिझोराम राज्यात आश्रय घेतला आहे. आता हे ख्रिस्ती मिझोराममधील ‘कुकी नॅशनल फ्रंट’ या फुटीरतावादी संघटने समवेत ईशान्य भारताला वेगळे करण्याच्या कामात साहाय्य करत आहेत, असा दावा करणारे ट्वीट ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

आतापर्यंत बांगलादेशी घुसखोर मुसलमानच देशात अवैध रहात असून कारवाया करत असल्याचे समोर येत असतांना आता तेथील ख्रिस्तीही भारतात येऊन भारत विरोधी कारवाया करत असल्याचे समोर येणे, हे भारतीय सुरक्षायंत्रणांना लज्जास्पद आहे !