कराचीमध्ये काश्मिरी आतंकवाद्याची हत्या !

‘सिंधुदेश रिवोल्यूशनरी आर्मी’ने घेतले दायित्व !

काश्मीरमधील आतंकवादी संघटना ‘अल्-बद्र’चा कमांडर सैयद खालिद रझा

कराची (पाकिस्तान) – येथे काश्मीरमधील आतंकवादी संघटना ‘अल्-बद्र’चा कमांडर सैयद खालिद रझा याला अज्ञातांना गोळ्या झाडून ठार केले. तो मृत्यूपर्यंत काश्मीरमध्ये सक्रीय होता. ‘सिंधुदेश रिवोल्यूशनरी आर्मी’ या संघटनेने रझा याच्या हत्येचे दायित्व घेतले आहे.

‘सिंधुदेश रिवोल्यूशनरी आर्मी’

रझा याला त्याच्या घराबाहेर गोळ्या झाडून ठार करण्यात आले. रझा सध्या येथील एका शाळेत उपाध्यक्ष म्हणून काम करत होता. गेल्याच आठवड्यात पाकमध्ये हिजबुल मुजाहिद्दीन या काश्मीरमधील आतंकवादी संघटनेचा कमांडर बशीर अहमद पीर याला अज्ञातांनी ठार केले होते.