पंजाबच्या कारागृहात सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपींमध्ये झालेल्या हाणामारीत दोघांचा मृत्यू, तर तिसरा घायाळ

गोइंदवाल साहिब कारागृह

तरणतारण (पंजाब) – येथील गोइंदवाल साहिब कारागृहामध्ये पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येच्या प्रकरणातील ३ आरोपींमध्ये हाणामारी झाली. यात मनदीप तुफान आणि मनमोहन सिंह या २ आरोपींचा मृत्यू झाला, तर केशव नावाचा तिसरा आरोपी गंभीररित्या घायाळ झाला आहे. त्याला उपचाराकरता रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

पोलीस उपअधीक्षक जसपालसिंह ढिल्लन यांनी दिलेल्या माहितीनुसार २६ फेब्रुवारीच्या सायंकाळी ३ आरोपींमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यांनी एकमेकांवर लोखंडी सळ्यांद्वारे आक्रमण केले. (कारागृहात आरोपींना लोखंडी सळ्या कशा मिळाल्या ? यावरून कारागृहाच्या व्यवस्थापनातील ढिसाळपणा दिसून येतो ! – संपादक) यात तिघेही घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता दोघांचा मृत्यू झाला, तर तिसर्‍यावर उपचार चालू आहेत.

संपादकीय भूमिका

आप सत्तेवर असलेल्या पंजाबमध्ये सर्वत्रच कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, हे लक्षात घेता सरकारने आता तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी !