अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
दोन्ही सभागृहांत ६ सहस्र ७१ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर
मुंबई, २७ फेब्रुवारी (वार्ता.) – कोल्हापूर येथील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कार्यवाहीसाठी २ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी (जिल्हा नागपूर) या तीर्थस्थळ विकास आराखड्याच्या कार्यवाहीसाठी २२ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत ही माहिती देण्यात आली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा आणि विधान परिषद येथे वर्ष २०२२-२३ वर्षांच्या ६ सहस्र ७१ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. त्या वेळी वरील माहिती देण्यात आली.
या पुरवणी मागण्यांमध्ये कृषी पंप ग्राहकांना वीज दरात सवलत देण्यासाठी १९६ कोटी ९५ लाख रुपयांची तरतूद, राज्यातील विविध ठिकाणी असलेले रस्ते आणि पूल यांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी ७०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.