रमेश बैस यांनी मराठीतून घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ !

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राज्यपालपदाची शपथ मराठीतून घेतली. ते महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल आहेत.

पुणे येथील ‘शिवसृष्टी’चा पहिला टप्पा ‘सरकारवाड्या’चे १९ फेब्रुवारीला लोकार्पण !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि ‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’च्या वतीने नर्‍हे-आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’चा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शिवजयंतीच्या दिवशी म्हणजेच १९ फेब्रुवारी या दिवशी लोकार्पण होणार आहे.

चीनचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि युरोप यांना भारताची आवश्यकता !

चीनचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि युरोप यांना आता भारताची आवश्यकता भासू लागली आहे; मात्र भारताला त्रास देण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय देश यांनी आतापर्यंत किती प्रयत्न केले ?, हे भारतियांनी कधी विसरू नये !

‘भुयारी गटार योजना’ म्हणजे पांढरा हत्ती पोसण्याचा उद्योग ! – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून शहरांमध्ये चालू असणारी ‘भुयारी गटार योजना’ म्हणजे भविष्यात पांढरा हत्ती पोसण्याचा उद्योग ठरणार आहे. ही भुयारी गटार योजना पुढे चालवणे अवघड असून या योजनेत अनेक त्रुटी आहेत.

जिवे मारण्याची भीती दाखवून मतिमंद युवतीवर अत्याचार !

समाजाची वासनांध मानसिकता पालटण्यासाठी महिलांवर अत्याचार करणार्‍या प्रत्येकाला कठोर शिक्षा त्वरित होणे आवश्यक आहे !

पुणे येथील शेतीपंपधारकांच्या वीजदेयकांची थकबाकी ७३ सहस्र कोटी रुपयांहून अधिक !

कोट्यवधी रुपयांची थकबाकी असणार्‍या महावितरण विभागाचा कारभार कसा चालतो, हे लक्षात येते. वीजदेयक न भरताही विज मिळते, अशी सवय ग्राहकांना लावणार्‍यांना कठोर शिक्षा करायला हवी !  

कर्नाटककडून कळसा-भंडुरा प्रकल्पांसाठी १ सहस्र कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद

कर्नाटकच्या म्हादई नदीवर उभारण्यात येणार्‍या कळसा-भंडुरा प्रकल्पांना दिलेली मान्यता ही केवळ तांत्रिक स्वरूपाची आहे.‘हायड्रोलॉजी’ आणि आंतरराज्य निकष यांनुसार ‘डी.पी.आर्.’ला मान्यता देण्यात आली आहे.

संग्रहालयाचे पावित्र्य नष्ट व्हावे, यासाठी कुणालाही अनुमती दिलेली नाही ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

आग्वाद किल्ला संग्रहालयात मद्यविक्रीचे दुकाने उघडले असल्याने स्वातंत्र्यसैनिक संघटना आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांच्याकडून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. मद्यविक्रीचे दुकान बंद न केल्यास सत्याग्रहाला आरंभ करण्याची चेतावणी दिली आहे.

शिबिरासाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांनी उपस्थिती लावण्याचा आदेश मागे घ्यावा ! – काँग्रेस

काँग्रेसला पोटशूळ ! भाजप सरकार गोव्यातील पारंपरिक कार्निव्हल महोत्सवाला आळा घालत आहे आणि योगऋषी रामदेवबाबा यांच्या शिबिराला शिक्षक, ‘एन्.सी.सी.’, ‘एन्.एस्.एस्.’ आणि ‘स्काऊट अँड गाईड’ स्वयंसेवक यांना बंधनकारक करत आहे.

लोकांना रोग आणि रोगांवरील औषधे यांमधून मुक्ती देण्यासाठी योग शिबिराचे आयोजन ! – योगऋषी रामदेवबाबा

सनातन धर्म हा सर्वसमावेशक आहे आणि यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. भारतियांच्या ‘डी.एन्.ए.’मध्ये (गुणसूत्रांमध्ये) रोग नव्हे, तर योग आहे. योगऋषी रामदेवबाबा यांचे सनातन जीवन शैली अंगीकारण्याचे आवाहन !