चीनचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि युरोप यांना भारताची आवश्यकता !

अमेरिकेतील ज्येष्ठ खासदार शूमर यांचा दावा

अमेरिकेचे ज्येष्ठ खासदार शूमर

नवी देहली – चीनचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय देश यांना भारताची आवश्यकता आहे. भारत जगातील सर्वांत मोठा लोकशाही व्यवस्था असलेला देश आहे. चीनचा भक्कमपणे सामना करण्याची भारतात क्षमता आहे, असे विधान अमेरिकेचे ज्येष्ठ खासदार शूमर यांनी केले. ते म्युनिच येथील सुरक्षा संमेलनात बोलत होते.

शूमर पुढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकशाही व्यवस्था कायम राखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. पुढील आठवड्यात भारताच्या दौर्‍यावर खासदारांच्या एका शक्तीशाली गटाचे नेतृत्व मी करणार आहे.

संपादकीय भूमिका

चीनचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि युरोप यांना आता भारताची आवश्यकता भासू लागली आहे; मात्र भारताला त्रास देण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय देश यांनी आतापर्यंत किती प्रयत्न केले ?, हे भारतियांनी कधी विसरू नये !