उद्धव ठाकरे यांचे चिन्ह गेल्याचा फारसा परिणाम होणार नाही ! – शरद पवार

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह काढून घेतल्याचा फारसा परिणाम होणार नाही. नवीन चिन्ह घेऊन त्यांना लोकांसमोर जावे लागेल आणि लोकही त्यांचे नवे चिन्ह मान्य करतील.

नामिबियातून आणखी १२ चित्ते भारतात आणले !

‘प्रोजेक्ट चित्ता’ अंतर्गत भारतात यापूर्वी ८ चित्ते आणण्यात आले होते. आता पुन्हा विमानाद्वारे आफ्रिका खंडातील नामिबिया देशातून १२ चित्ते आणण्यात आले आहेत. त्यांना मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले आहे.

‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’च्या लढाऊ विमानावर पुन्हा लावण्यात आले श्री हनुमंताचे चित्र !

बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या आशियातील सर्वांत मोठ्या ‘हवाई कवायतीं’च्या कार्यक्रमात ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’च्या अर्थात् ‘हॉल’च्या लढाऊ विमानावर पुन्हा श्री हनुमंताचे चित्र लावल्याचे दिसून आले.

काहींना भारत आणि पंतप्रधान मोदी यांचे यश पहावत नाही ! – ब्रिटीश खासदार रामी रेंजर

काहींना भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यश पहावत नाही, अशा शब्दांत ब्रिटीश खासदार रामी रेंजर यांनी बीबीसीच्या हिंदुद्वेषी आणि भारतद्वेषी माहितीपटावरून बीबीसीला फटकारले.

पंजाबमध्ये पाकिस्तानी तस्करांशी भारतीय सैनिकांची चकमक

गुरदासपूर येथील भारत-पाक सीमेवर सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानी तस्कर यांच्यात चकमक उडाली. हे तस्कर अमली पदार्थ आणि शस्त्रे यांची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते. ते पाईपद्वारे भारताच्या सीमेमध्ये अमली पदार्थ आणि शस्त्रे पोचवत होते.

तालिबानने पाकिस्तानवर नियंत्रण मिळवल्यास आश्चर्य वाटू नये ! – तस्लिमा नसरीन

पाकमध्ये सातत्याने तालिबानी आतंकवादी घातपात करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर तस्लिमा नसरीन यांनी हे विधान केले आहे.

जॉर्ज सोरोस यांना वाटते की, जग त्यांच्या विचारांनुसार चालते ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रत्युत्तर

अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती असलेल्या जॉर्ज सोरोस यांनी ‘भारतातील उद्योगपती अदानी यांच्यावर आरोपांच्या प्रकरणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर द्यावे लागेल’, असे विधान केले होते.

ढाका विश्वविद्यालयातील रविंद्रनाथ टागोर यांचा पुतळा जिहाद्यांनी तोडला !

याविषयी भारत सरकार, तसेच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काही बोलतील का ?

हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यास ऑस्ट्रेलिया सरकारला सांगा ! – भारतियांची जयशंकर यांच्याकडे मागणी

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आहेत. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील भारतियांनी ‘जयशंकर यांच्याकडे ही मागणी केली.

दुर्गाडी (ठाणे) गडाचा खटला वक्फ मंडळाकडे हस्तांतरित करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली !

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार जेथे निर्माण केले, तो दुर्गाडी गडावरील श्री दुर्गादेवीचे मंदिर हे ‘मैलिस-ए-मुशवरीन मशीद’ असल्याचा दावा करून त्याविषयीचा खटला वक्फ मंडळाकडे हस्तांतरित करण्याची मागणी काही स्थानिक मुसलमानांनी केली होती.