जगामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी पंतप्रधान मोदी सर्वांना एकत्रित करतील !

एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य ! भारताने जी-२० परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. मी माझे मित्र नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास करतो की, ते आम्हाला जगात शांतता आणि सशक्त बनवण्यासाठी एकत्र आणतील, असे ट्वीट करत फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वतः एकत्र असलेले एक छायाचित्र पोस्ट केले आहे.

(म्हणे) ‘युद्ध झाल्यास पूर्ण शक्तीनीशी सामना करू !’

गेल्या ७५ वर्षांत पाकने भारताशी केलेल्या चारही युद्धात सपाटून मार खाल्ला आहे. पाकचे २ तुकडेही झाले आहेत. तरीही पाकची खुमखुमी संपलेली नाही. पाकचा संपूर्ण नायनाट जोपर्यंत केला जात नाही, तोपर्यंत हे असेच चालणार !

जगातील सर्वांत प्रदूषित देशांमध्ये भारत ५ व्या क्रमांकावर !

विदेशी आस्थापनांनी सिद्ध केलेले अशा प्रकारचे अहवाल किती खरे असतात, याचाही आता शोध घेण्याची आवश्यकता आहे. पाश्‍चात्त्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते, हे जगजाहीर असतांना विकसनशील देशांना प्रदूषणासाठी जाणीवपूर्वक अशा प्रकारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे !

पाकिस्तान, चीन, रशिया, सौदी अरेबिया आदी १२ देशांमध्ये होते धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी ! – अमेरिका

यापूर्वी अमेरिकेने भारताविषयीही अशाच प्रकारचे विधान केले होते. त्यावरून भारताने अमेरिकेला खडसावले होते. त्यामुळे अमेरिकेने आता भारताचे नाव घेतलेले नाही, तर जेथे खर्‍या अर्थाने धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी होते, अशा काही देशांची नावे घेतली आहे, हे विशेष !

इस्रायली दिग्दर्शक लॅपिड यांच्या ‘कश्मीर फाइल्स’विषयीच्या विधानाला अन्य ३ परीक्षकांचे समर्थन !

लॅपिड यांनी त्यांच्या विधानावरून क्षमा मागिल्यानंतर आता पुन्हा अशा प्रकारे अन्य ३ परीक्षकांनी म्हणणे म्हणजे हा एका मोठ्या षड्यंत्राचा भाग आहे, असेच वाटू लागले आहे ! याचा आता केंद्र सरकारने शोध घेणे आवश्यक आहे !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनेच मिळणार हिंदूंना आधार !

‘पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका इत्यादी देशांतीलच नव्हे, तर भारतातील काश्मीरसह सर्वत्रच्या हिंदूंना आता कुणाचा आधार नाही. तो देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी युद्ध पातळीवर कार्यवाही करा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

जत तालुक्यातील गावांसाठी महत्त्वाची विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. उपसा सिंचन योजना आणि गावांतील पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी विविध विभागांनी कार्यवाही करावी.

श्री गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रमात पालट करण्याची पुणे विद्यापिठाची भूमिका !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील ‘श्री गणेश अथर्वशीर्ष’ अभ्यासक्रमावर टीका झाल्याने अभ्यासक्रमात पालट करण्याची भूमिका विद्यापिठाने घेतली आहे.

महाराष्ट्रातील ४ महानगरांमध्ये ‘जी २०’ परिषदेच्या १४ बैठका होणार !

‘जी २०’ परिषदेच्या १६१ बैठका भारतात होणार असून त्यांतील १४ बैठका महाराष्ट्रात होणार आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, संभाजीनगर आणि नागपूर या महानगरांमध्ये या बैठका होतील.