धर्म वाचवण्याकरिता तरी किमान सर्वांनी एकत्र येणे आवश्यक ! – ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर)

शालेय जीवनामध्ये मुले मैदानी खेळ, स्पर्धा विसरले आहेत. ते अधिकाधिक वेळ भ्रमणभाषचा वापर करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे भावी पिढी बरबाद होत असून शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही भ्रमणभाष वापरण्यावर बंदी करावी.

लोकलमध्ये महिलेचे छायाचित्र काढणार्‍या धर्मांधाला अटक !

नेरूळ ते वडाळा लोकलगाडीने प्रवास करतांना महिलेचे छायाचित्र काढणार्‍या धर्मांधाला प्रवाशांनी चोप देऊन पोलिसांच्या कह्यात दिले. या प्रकरणी वाशी लोहमार्ग पोलिसांनी फरीद असगर अली अन्सारी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.

कर्नाटकच्या नेत्यांना मुंबई आणि राज्यात न येण्यास बंदी करू शकतो; पण तसे करणार नाही ! – दीपक केसरकर, पालकमंत्री

कर्नाटककडे रस्ते दुरुस्तीसाठी पैसे नाहीत आणि महाराष्ट्राला टक्कर देण्याची भाषा करतात ? आम्हीही कर्नाटकच्या नेत्यांना मुंबई आणि राज्यात न येण्यास बंदी करू शकतो; पण आम्ही तसे करणार नाही.

तेलंगाणाच्या धर्तीवर विकास करा किंवा तेलंगाणात जाऊ द्या ! – सीमावर्ती गावकर्‍यांची मागणी

आतापर्यंतच्या सरकारांनी जनतेत राज्याविषयी स्वाभिमान निर्माण न केल्याचा परिणाम !

भौतिक प्रगतीसह आध्यात्मिक शांततेसाठी अथर्वशीर्ष अभ्यासक्रमाविषयी माघार नाही ! – चंद्रकांत पाटील

एका गल्लीत चार-चार गणपति मंडळे हवीत; मात्र त्यांचा शास्त्रीय अभ्यासक्रम का नको ? अथर्वशीर्ष अभ्यासक्रम हा शास्त्रीय अध्ययनाचा भाग असून केवळ राजकारण म्हणून विरोध नको. भौतिक प्रगतीसह आध्यात्मिक शांतता महत्त्वाची आहे.

नगर येथील ख्रिस्ती शाळेत शीख विद्यार्थ्याला धर्मांतरासाठी दबाव टाकणार्‍या शाळेच्या उपमुख्याध्यापकांना अटक !

राहुरीतील ‘डी पॉल इंग्लीश मिडियम स्कूल’मधील नववीत शिकणार्‍या हरदिलसिंह सोदी या शीख विद्यार्थ्याला ख्रिस्ती धर्मात येण्यासाठी धमकवणारे शाळेचे उपमुख्याध्यापक फादर जेम्स यांच्यावर गुन्हा नोंद होऊन त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पंढरपूर विकास आराखड्यातील प्रस्तावित ‘कॉरिडॉर’ प्रकल्पाला वारकरी संप्रदायाचा विरोध !

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ फडकरी, दिंडीप्रमुख, मठाधिपती, संस्थानिक यांच्या बैठकीत पंढरपूर विकास आराखड्यातील प्रस्तावित ‘कॉरिडॉर’ प्रकल्पाला वारकरी संप्रदायाचा विरोध करण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला.

तंत्रज्ञान…जरा आवरा !

जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्रेडेमस याने वर्तवलेल्या एका भविष्यात ‘कृत्रिम बुद्धीमत्ता असणार्‍या रोबोची निर्मिती होईल आणि ते रोबो मानवजातीचा विनाश करतील’, असे म्हटले आहे. यातून शिकण्याचे तात्पर्य असे की, तंत्रज्ञानाला वेसण घातले नाही, तर ते अनियंत्रित होऊन मानवाचाच घात करू शकते, हे येथे लक्षात घ्यायला हवे.

तरुणीवर बलात्कार करणार्‍या जब्बार ख्वाजा अहमद नदाफला अटक !

सुविधा मिळवण्यात अल्पसंख्य, तर गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असलेले धर्मांध !

तृणमूल काँग्रेसवर बंदी का घातली जात नाही ?

मिदनापूर (बंगाल) येथील तृणमूल काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी राजकुमार मन्ना यांच्या घरात गावठी बाँब बनवतांना झालेल्या स्फोटात पक्षाच्या ३ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला, तर काही जण घायाळ झाले.