
नागपूर, २६ डिसेंबर (वार्ता.) – मागील काळात वाळूमाफियांना राजाश्रय मिळत होता. त्यातून तहसीलदार आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या अंगावर गाडी घालण्याचे प्रकार झाले. भविष्यात मात्र या प्रकरणांना आळा घालण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत राज्यशासन नवीन वाळू उत्खनन धोरण घोषित करेल, अशी घोषणा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी २६ डिसेंबर या दिवशी विधानसभेत केली.
डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सभागृहात बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे चालू असलेल्या वाळूच्या अवैध उत्खननाला आळा घालण्याची मागणी केली.

यावर उत्तर देतांना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘‘बुलढाणा येथे होत असलेल्या वाळूच्या अवैध उत्खननाविषयी नायब तहसीलदार, तसेच यामध्ये सहभागी असलेल्यांची अमरावती येथील विभागीय आयुक्तांद्वारे चौकशी करण्यात येईल. राज्यात चालू असलेले वाळूचे अवैध उत्खनन रोखण्यासाठी सर्व जिल्हाधिकार्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये खाणीपट्टयांचे अवैधरित्या होत असलेले उत्खनन रोखण्याचीही सूचना देण्यात आली आहे. राज्यात नदी, वाळू, खाणी यांतील वाळूचे अवैध उत्खनन चालू आहे. याला आळा घालण्यासाठी घोषित करण्यात येणार्या नवीन धोरणामध्ये सामान्य नागरिकांनाही वाळू उत्खननाचा परमिट परवाना मिळेल आणि तोही सरकारकडून मिळेल. वाळू उत्खननामध्ये राजकीय संबंध आहेत. राजकीय संबंधातील लोकांना पोसण्याच्या प्रकारांना नवीन धोरणामुळे आळा बसेल. हे धोरण सर्वंकष आणि लोकाभिमुख असेल. नवीन धोरणामुळे राज्याची वाळूमाफियांपासून सुटका होईल.’’
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !
फोर्ट (मुंबई) येथील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित पैशांच्या वसुलीची नोटीस !
Foreign Universities In India : १५ विदेशी विद्यापिठांना भारतात शाखा चालू करण्यास संमत्ती
Ghaziabad Mazar Demolished : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे अतिक्रमण करून बांधलेली ३ मजली मजार भुईसपाट !
Ram Temple Raid : श्रीराममंदिरातील दान चोरीतील ८ आरोपींच्या घरी पोलिसांची धाड
तुळजापूर मंदिरातील सशुल्क दर्शन पास बंद करण्यासाठी पुजारी मंडळाचे धरणे आंदोलन !